Sunday, February 27, 2022

Evil Eye, नज़र !

नजर लागणे किंवा नजर उतरवणे याबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलेलं असतं. घरातील लहान मुलं आजारी पडली की आई, आजी त्याची नजर उतरताना आपण पाहिलं असेलच. ही नजर लागते म्हणजे नक्की काय?  आणि त्यावर काय काय उपाय करतात याबद्दल आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते.
जेव्हा आपण एखाद्या बाबतीत प्रगती करतो,  यश संपादन करतो,  सुखात असतो  तेव्हा काही व्यक्तींच्या मनात त्याबद्दल कळत नकळत ईर्षा निर्माण होते.  जर तो व्यक्ती आपला द्वेष करणारा असेल तर त्या व्यक्तीतून नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन बाहेर पडते आणि आपल्या शरीराभोवती असलेल्या (aura)  तेजोवलयावर प्रभाव टाकत असते.  हे तेजोवलय  इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्ड असते. किरीलीयन फोटोग्राफी द्वारे ते आपण पाहू शकतो. लहान मुलांमध्ये हे  इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड किंवा तेजोवलय कमी प्रमाणात असते त्यामुळे लहान मुलांवर या निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम लवकर होतो.  त्यालाच आपण नजर लागणे असे म्हणतो.
   जगभरातील सर्वच संस्कृतीत नजर काढण्याचे अथवा नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्याचे उपाय सांगितलेले आहेत. भारतातील सर्व समाजात काळी तीट अथवा काला टीका लावण्याची किंवा मनगटी, काळे मणी, काळा धागा बांधण्याची परंपरा हा ही त्यावरचा एक उपाय मानला जातो. तसेच अनेक पाश्चात्त्य आणि आफ्रिकन देशात डोळ्यांच्या प्रतीमे चे दागिने (Evil Eye Jewellery) घालण्याची प्रथा दिसून येते.
जेव्हा दुष्ट शक्ती अथवा निगेटिव्ह एनर्जी किंवा नजर आपल्यावर पडते, तेव्हा ती या काळ्या तीटावर, धाग्यावर अथवा डोळ्यांच्या प्रतिमेवर जावी हा त्यामागचा उद्देश असतो  म्हणूनच काळी तीट डोळ्यांच्या जवळपासच लावली जाते. तसेच  ईविल आय ज्वेलरी ही लक्ष जाईल अशा ठिकाणी ब्रेसलेट अथवा पेडंट स्वरूपात वापरली जाते. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी क्रिस्टल हीलींग थेरपी यामध्ये वापरण्यात येणारे क्रिस्टल ईविल आय ज्वेलरी मध्ये वापरले जातात. त्यात प्रामुख्याने रोज क्वार्टझ किंवा मोती असणाऱ्या शिंपल्यातील आतला भाग (Mother of pearl) याचा उपयोग करतात.  या रोज क्वार्टझ् व मदर ऑफ पर्ल पासून बनलेले ईविल आय अतिशय प्रभावी मानले जातात. अशा प्रकारचे ईविल आय पेंडंट, ब्रेसलेटस् तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहेत. नकारात्मकता दूर करण्याबरोबरच फॅशन स्टेटमेंट म्हणून ईविल आय ज्वेलरी नावारूपाला आलेली आहे.



No comments:

Post a Comment